पेशावर : खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिओचे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये पुष्टी झालेल्या पोलिओ रुग्णांची संख्या १० झाली आहे. इस्लामाबादस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथील पोलिओ निर्मूलनासाठीच्या प्रयोगशाळेने लक्की मारवत आणि बन्नू जिल्ह्यांतील प्रकरणांची पुष्टी केली. या वर्षी पाकिस्तानमध्ये एकूण १० पोलिओचे रुग्ण आढळले आहेत, ज्यात खैबर पख्तुनख्वामध्ये पाच, सिंधमध्ये चार आणि पंजाबमध्ये एकाचा समावेश आहे. देशभरात पोलिओ लशीकरण मोहिमा सुरू आहेत; परंतु दक्षिण खैबर पख्तूनख्वा येथे अजूनही घरोघरी लसीकरण मोहिमेत अडचणी येत आहेत. त्या हजारो लशीकरण न झालेल्या मुलांना पोलिओ विषाणूच्या संपर्कात येण्याचा धोका निर्माण होतो.
Fans
Followers